Ad will apear here
Next
ठाणे येथे संस्था बळकटीकरणावर कार्यशाळा


ठाणे : येथील साद फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट यांच्या विद्यमाने अंबरनाथ पूर्व येथील शांताराम जाधव ज्येष्ठ नागरिक सभागृहात ‘संस्था बळकटीकरण’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात ठाणे जिल्ह्यातील अनेक संस्थांचे विश्वस्त सहभागी झाले होते.  

सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने अनेक सामाजिक संस्था, मंडळ, प्रतिष्ठान, ट्रस्ट धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी होतात; मात्र फार कमी संस्था आपल्या ध्येयधोरणानुसार संस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करणारे उपक्रम यशस्वीपणे राबवतात. संस्था विश्वस्त, पदाधिकारी यांना पुरेसे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपल्या क्षेत्रात कार्य करण्यास अडचणींना सामोरे जावे लागते. अशा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.  

सुरुवातीला ‘साद’च्या अध्यक्ष अॅड. पल्लवी यांनी ‘संस्थाचे बळकटीकरण’ या संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची  प्रस्तावना मांडली. त्या म्हणाल्या, ‘प्रत्येक संस्थेची आपल्या कार्यक्षेत्रात समुदयासोबत काम करत असताना स्वतःची काही ध्येय व उद्दिष्ट्ये असतात. त्या उद्दिष्टांना समोर ठेऊन संस्था आपली कार्यप्रणाली निश्चित करत असते. संस्थेच्या विकासासाठी संस्थेची ध्येय व उद्दिष्ट्ये, तसेच त्या मागची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे असते.’

या पहिल्या कार्यशाळेत ‘कोरो’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या राहुल यांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी संस्था स्थापन करताना आपल्या क्षमतांवर संस्थेची उद्दिष्टे ठरवतनाच संस्थेत काम करणारे सहकारी विचाराने जोडले पाहिजेत, असे सांगितले.



शेवटच्या सत्रात संस्था बळकट होण्याच्या दृष्टीने नियोजन व कृती आराखड्याची मांडणी करण्याच्या दृष्टीने उपस्थित विश्वस्तांना थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक संस्था व शासन मिळून सामाजिक बदलाची भविष्यकालीन प्रक्रियेची सुरुवात या कार्यशाळेच्या निमित्ताने होत असल्याची प्रतिक्रिया श्रुती क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील कांबळे, संदीप बारस्कर, प्रदीप पवार व साद युवा टीमच्या अश्विनी बापट, दत्तात्रय पाटील, सागर खरात, पूजा भोईर, संकेत पवार, शिखा, जगदीश यांचे सहकार्य लाभले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZNRBV
Similar Posts
भारतीय मजदूर संघाचा ठाणे जिल्हा मेळावा उत्साहात ठाणे : भारतीय मजदूर संघाच्या ठाणे जिल्ह्याचा मेळावा डोंबिवली येथील कानविंदे व्यायाम शाळेच्या सभागृहात नुकताच उत्साहात झाला. या मेळाव्याला भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री रवींद्र देशपांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सुरेश म्हात्रेंचा वाढदिवस ‘मातोश्री’मध्ये साजरा भिवंडी : शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे संपर्कप्रमुख, परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती तथा गटनेते सुरेश गोपीनाथ म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी आपला वाढदिवस खडवली येथील वृद्धाश्रमात सपत्नीक साजरा केला. या वेळी या आश्रमातील वृद्धांशी मनमोकळ्या गप्पा मारून व सहभोजन करत त्यांचा आशीर्वाद घेतला.
ठाण्यात संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचे आयोजन ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे ११ ते १४ जानेवारी २०१९ या कालावधीत ठाण्यातील उपवन सरोवाराशेजारील प्रांगणात संस्कृती आर्ट्स फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. गेली चार वर्षे संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टमार्फत या कला महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला पोलिसांचा पहारा ठाणे : आज (३१ जुलै) आषाढी अमावास्या असून, हा दिवस गटारी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो; या दिवशी मद्यप्राशन करण्यासाठी गर्दी नसलेल्या ठिकाणांना विशेष पसंती दर्शविली जाते. ही बाब लक्षात घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मद्यप्राशनासाठी जाणाऱ्यांवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ‘वॉच’ ठेवला आहे. वनात जाणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language